Revelation 13:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याची शक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशाली कोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून सर्वांनी अजगराची आराधना केली, त्यांनी श्वापदाची आराधना करताना म्हटले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले; आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?”