Revelation 13:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्या कोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील.