Revelation 14:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी पाहिले, आणि तेथे माइयासमोर कोकरा होता. तो सियोन पर्वतावर उभा होता. त्याच्याबरोबर 1,44,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.