Revelation 14:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पीडले जाईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात भरपूर प्रमाणात ओतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि हे करणाऱ्यांना पवित्र देवदूतांसमक्ष व कोकरांसमक्ष अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.