Revelation 14:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला, तो आवाज म्हणाला, “हे लिही: येथून पुढे, जे प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते त्यांच्या श्रमापासून विश्रांति घेतील.” आत्मा म्हणतो, “होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांति पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहतील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही: प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.” आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.”