Revelation 14:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि आकाशातून पुराच्या लाटांचा लोंढा आल्यासारखा आवाज, ढगांचा मोठा गडगडाटाचा आवाज ऐकला. जो आवाज मी ऐकला तो जणू काय अनेक लोक आपल्या वीणा वाजवीत आहेत तसा आवाज होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अनेक जलप्रवाहांच्या निनादासारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. जी वाणी मी ऐकली, ती जणू काही वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती.