Revelation 14:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहू लागले, त्याचा प्रवाह सुमारे दोन मीटर खोल असून तो सुमारे तीनशे किलोमिटर वाहत गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ते द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडवले गेले;’ त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.