Revelation 14:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक सिंहासनासमोर आणि चार जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले, असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक राजासन, चार प्राणी व वडीलजन ह्यांच्यासमोर एक नवे गीत गात होते. ते गीत ह्यांच्याशिवाय कोणीही शिकू शकले नाहीत. पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी ह्यांचेच तारण झाले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.