Revelation 14:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वत:ला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वत:ला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिले आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकऱ्याला प्रथमफळ असे आहेत.