Revelation 15:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर मी अत्यंत रहस्यमय, थक्क करणारे व भव्य असे दुसरे एक दृश्य स्वर्गात पाहिले. सात साथीचे रोग आणणारे सात देवदूत दृष्टीस पडले. ते रोग शेवटचे होते, कारण देवाच्या क्रोधाची ती अंतिम अभिव्यक्ती होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.