Revelation 15:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले: “प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान आणि अदभुत गोष्टी करतोस. राष्ट्रांच्या राजा, तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.