Revelation 16:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्‍या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले.