Revelation 16:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा उच्च वाणी मंदिरातील राजासनापासून निघाली, ती म्हणाली: “झाले!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.”