Revelation 16:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका भयाण भूकंप झाला की, पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका भयंकर भूकंप कधी झाला नव्हता!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला,