Revelation 16:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रत्येकी सुमारे पन्नास किलो वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या विपत्तीमुळे लोकांनी देवाला शिव्याशाप दिले, कारण त्या गारांची विपत्ती अतिभयंकर होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.