Revelation 17:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ते सात राजेसुद्धा आहेत. त्यापैकी पाच राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक जिवंत आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर थोडाच वेळराहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ती डोकी म्हणजे सात राजे आहेत,2 त्यांपैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल.