Revelation 17:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जी दहा शिंगे तू पाहिलीस ती म्हणजे दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही. परंतु त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजाचा अधिकार दिला जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी ‘दहा शिंगे’ तू पाहिलीस ‘ती दहा राजे आहेत,’ त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.