Revelation 17:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग मी आत्म्याने प्रभावित झालो असताना, त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व ‘दहा शिंगे’ असलेल्या किरमिजी रंगाच्या ‘श्वापदावर’ बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती.