Revelation 17:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती स्त्री पवित्र लोकांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.