Revelation 18:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील: “भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचे त्यांना भय वाटते म्हणून ते दूर उभे राहतील आणि म्हणतील, ‘किती भयंकर! किती किळसवाणे! अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, हाय! ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल; कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे!