Revelation 18:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती, त्या गोष्टी आता तुइयापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभव नाहीसे झाले आहे. त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
व्यापारी तिला म्हणतात, ‘ज्या चांगल्या गोष्टी मिळवण्याची तुला उत्कंठा लागली होती त्या नष्ट झाल्या आहेत. तुझी धनदौलत व विलासाची साधने नाहीशी झाली आहेत व ती पुढे कोणाला मिळणार नाहीत!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे; आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा तुला कधीच पुनर्लाभ होणार नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत; सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत.