Revelation 18:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभे राहतील, ते रडतील व शोक करतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिच्या साहाय्याने धनवान झालेले व्यापारी रडत व शोक करीत, तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील