Revelation 18:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि ओरडतील: “भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमीजी व जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि म्हणतील, ‘अरेरे, ह्या महान नगरीची दशा किती भयंकर व किती किळसवाणी झाली आहे! तागाची तलमवस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि म्हणतील, “अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आक्रोश करून म्हणतील: “ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी! जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या, सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हणतील, हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिऱ्यामोत्यांचा साज घालीत असे.