Revelation 18:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!” प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली. सर्व तांडेल, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व जण, खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.” सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका क्षणात तिची सर्व संपत्ती नष्ट झाली!’ “प्रत्येक जहाजाचे कप्तान आणि खलाशी व समुद्रापासून उत्पन्न मिळविणारे सर्वजण दूर अंतरावर उभे राहतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे तांडेल, गलबतावरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर उभे राहिले,