Revelation 18:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही तुइया येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुझ्यात दिव्याचा उजेड. ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.