Revelation 18:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला: “माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील कोणतीही विपत्ती ओढवू नये म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.