Revelation 18:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या परिमाणाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या परिमाणाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही. मी दुःख पाहणारच नाही!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.