Revelation 18:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला, ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते तिच्याकरता ऊर बडवून शोक करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील.