Revelation 19:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते: “हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जणू एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “देवाचा गौरव असो! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,