Revelation 19:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
राजांचे, सैन्याधिकाऱ्यांचे व सैनिकांचे, घोड्यांचे व त्यांवरील स्वारांचे, तसेच स्वतंत्र व दास, लहान आणि मोठ्या अशा सर्व लोकांचे मांस खावयास या!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाचे’ मांस, सरदारांचे मांस, ‘बलवानांचे मांस, घोड्यांचे’ व त्यांवरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस ‘खाण्यास’ या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या आणि राजांचे, कप्तानांचे व मोठमोठ्या सेनाधिकार्यांचे मांस खा! घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे, सर्व लहान, थोर, स्वतंत्र, दास यांचे मांस खावयास या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल.