Revelation 19:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तो मला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”