Revelation 2:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू कुठून पतन पावला आहेस, ह्याचा विचार कर व पश्चात्ताप करून पहिल्याप्रमाणे वागू लाग. तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्‍चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.