Revelation 2:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(तुझी कृत्ये,) तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे (तरी तू धनवान आहेस) आणि जे यहूदी नसताही स्वतःला यहूदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.