Revelation 20:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मी पाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.