Revelation 20:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करुन आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगराला वेढा दिला. परंतु स्वर्गातून अग्नि खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जनांची छावणी व देवाला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरून पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढले; ‘तेव्हा [देवापासून] स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘खाऊन टाकले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जणांची छावणी व परमेश्वराला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पृथ्वीच्या विस्तारावर गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरी वेढली; तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना गिळून घेतले;