Revelation 21:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्राएलाच्या संतानाच्या बारा वंशांची होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला मोठा उंच तट होता; त्याला बारा ‘वेशी’ होत्या, आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर ‘नावे’ लिहिलेली होती; ती ‘इस्राएलाच्या संतानाच्या’ बारा ‘वंशांची’ होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचे तट रुंद व उंच होते. तिला बारा मोठमोठ्या वेशी असून त्यावर बारा देवदूत पहारा करीत होते. त्या वेशींवर इस्राएलच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा वेशी होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे होती,