Revelation 21:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैल भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती नगरी चौरस होती. म्हणजेच तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला दोन हजार चारशे किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरी ‘चौरस’ होती; तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी व उंची समान होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या.