Revelation 22:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.