Revelation 22:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे मनुष्य अयोग्य वागतो. तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे! जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे! जो मनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.”