Revelation 3:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबोरबर जेवेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.