Revelation 3:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी ‘जीवनाच्या पुस्तकातून’ त्याचे नाव ‘खोडणारच’ नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,