Revelation 4:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवत होते. व म्हणत होते की:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात