Revelation 4:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजासनाभोवती चार बाजूंस चार प्राणी होते. त्यांना पुढे व मागे अंगभर डोळे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजासनापुढे ‘स्फटिकासारखा’ जणू काय काचेचा समुद्र होता; ‘आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंना’ पुढे व मागे ‘अंगभर डोळे असलेले चार प्राणी’ होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते. राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते.