Revelation 5:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.