Revelation 5:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. व वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.