Revelation 6:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत व बेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली.