Revelation 7:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविले होते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्यांना थोपवून धरीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये.