Revelation 7:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील.