Revelation 7:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मी आणखी एक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांना मोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले. देवदूत त्या देवदूतांना म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला,