Revelation 7:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.